ED पेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या Ganesh बिडीची किंमत जास्त – Dhananjay Munde
64 आमदारांचे मुख्यमंत्री झाले 54 आमदारांचे उपमुख्यमंत्री झाले. 44 आलेले मंत्री झाले आणि 105 वाले विरोधी पक्षात बसले आहेत. नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले आहेत मात्र भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.
उस्मानाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त आज उस्मानाबाद दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मंत्री राजेश टोपे, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी यावेळी विविध मुद्यांवर भाष्य केलं. जगाला खऱ्या लोकशाहीचे दर्शन कुणी घडवून दाखवले असेल तर आदरणीय पवार साहेबांनी जगाला दाखवलं. 64 आमदारांचे मुख्यमंत्री झाले 54 आमदारांचे उपमुख्यमंत्री झाले. 44 आलेले मंत्री झाले आणि 105 वाले विरोधी पक्षात बसले आहेत. नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले आहेत मात्र भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या कारवायांवरुन धनंजय मुंडे यांनी त्यांच्या खास शैलीत टीका केली आहे.