कुठेही करा, कसेही करा पण त्यांना अडकवा, शिंदे सरकारच्या निशाण्यावर कोण?
आता शिंदे सरकार आले आणि पुन्हा न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. त्यांना कुठे काही मिळत नाही. पण, कसल्या तरी प्रकरणात अटक दाखविण्याचा हा प्रयत्न सुरु आहे.
जळगाव : विधानसभेच्या निवडणूक झाल्या. त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार म्हणून माझे नाव येत होते. मात्र, त्याचवेळी षडयंत्र रचले गेले. महसूलमंत्री असताना माझ्या पीएने पैसे घेतले. दाऊदच्या बायकोशी संबंध जोडले आणि ज्या भूखंड प्रकरणाचा दुरानव्येही संबंध नाही अशा प्रकरणात गोवले गेले. माझा राजीनामा घेतला. झोटिंग समिती नेमली. आयकर विभाग आणि ईडीनेही चौकशी केली. माझ्या जावयांना अटक केली तेव्हा न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने प्रोटेक्शन दिले म्हणून अटक टळली. ईडीने सातत्याने आम्हाला त्यांना अटक करायची आहे जामीन रद्द करावा म्हणून अर्ज केला. पण, न्यायालयाने तुमचा हेतू शुद्ध नाही असे फटकारून अर्ज फेटाळले. आता शिंदे सरकार आले आणि पुन्हा न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. त्यांना कुठे काही मिळत नाही. पण, कसल्या तरी प्रकरणात अटक दाखविण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. कुठेही करा, कसेही करा पण यांना अडकवा असा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर केला आहे.