एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ ठरला, तर 'ही' लोकसभेची जागा लढवणार

एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ ठरला, तर ‘ही’ लोकसभेची जागा लढवणार

| Updated on: Sep 12, 2023 | 11:28 PM

रावेर लोकसभा मतदार संघावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांनी हे धनुष्यबाण पेलावे अशी इच्छा व्यक्त केली. तर, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी ही जागा कॉंग्रेसची असल्याचा दावा केला आहे.

जळगाव : 12 सप्टेंबर 2023 | जळगाव येथील शरद पवार यांच्या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघासाठी खडसे यांनी धनुष्यबाण उचलावे असे वक्तव्य केले होते. मात्र, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी रावेर लोकसभेच्या जागेवर आपला दावा कायम ठेवला आहे. कोणी काहीही म्हटलं असेल तरी आमचा दावा कायम राहणार आहे. रावेरची जागा ही आधीपासून काँग्रेसची आहे आणि काँग्रेसलाच मिळाली पाहिजे अशी आघाडीमध्ये आमची मागणी कायम राहील असे थोरात यांनी म्हटले आहे. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना पक्षाचा आदेश आला तर मी लोकसभा लढवणार असे म्हटले आहे. इंडियाच्या माध्यमातून रावेर लोकसभेची जागा आम्हाला आली आणि पक्षाने मला आदेश दिला. तर मी लोकसभा निवडणूक लढवणार असे विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

Published on: Sep 12, 2023 11:28 PM