राज्यपालांची प्रतिमा महाराष्ट्रात वादाची ठरली, काय म्हणाले एकनाथ खडसे?

| Updated on: Feb 12, 2023 | 4:32 PM

VIDEO | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया, बघा व्हिडीओ

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला,जनतेने त्यांच्याविरोधात उठाव, आंदोलन केलेत. जनतेच्या मनात एक प्रकारे त्यांच्याविषयी संताप होता. मात्र उशिरा का होईना त्यांचा राजीनामा मंजूर झाला. महाविकास आघाडीचे सरकार असताना नियमानुसार 12 आमदारांची नियुक्ती त्यांनी करायला हवी होती, मात्र कोणाच्यातरी सांगण्यावरून त्यांनी ते केले नाही, अशी टीका एकनाथ खडसे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर केली. राज्यपाल हे एका विशिष्ट व्यक्तीच्या, पक्षाचं हातचं बाहुलं होत़ं, अशी परिस्थिती त्यांची होती. महाराष्ट्रभरात राज्यपालांची प्रतिमा एक प्रकारे वादाची ठरली. राज्यपाल पदाची प्रतिष्ठा त्यांनी घालवली होती, बरं झालं या महाराष्ट्रातून हे राज्यपाल गेले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Published on: Feb 12, 2023 04:32 PM
राज्यपाल कोश्यारी यांचा ‘विषारी’ असा उल्लेख, काय म्हणाल्या रूपाली ठोंबरे पाटील?
‘या’ कारणामुळे मी मुख्यमंत्री झालो; एकनाथ शिंदे यांनी आपला प्लस पॉइंट सांगितला…