Breaking : पतिव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?; नाथाभाऊंचा शिंदे गटावर हल्लाबोल
आपल्या जिल्ह्यातील 5 आमदार शिंदेंच्या गटात गेले. बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि दुसरीकडे गेलात हे जनता पाहत आहे. राज्यातील जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असं सांगतानाच आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे.
अनिल केऱ्हाळे, जळगाव: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर (bjp) जोरदार हल्ला चढवला आहे. बाळासाहेबांच्या पुण्याईवर निवडून आलात आणि त्यांच्याच कुटुंबीयांवर तुम्ही टीका करत आहात. 200 कोटी आणले काय आणि 500 कोटी आणले, त्याला काय अर्थ आहे? तुम्ही 200 कोटीच काय 600 कोटी आणले असतील . पण तत्त्व आणि सत्त्व शिल्लक राहिले नाही. पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. पाचोरा येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारही (ajit pawar) उपस्थित होते.
राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघड चालली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडं राजकारण कधी झालं नव्हतं. खोक्यांची भाषा कधी झाली नव्हती. अलीकडे हे सरकार पाडायच, ते पाडायचं हेच चाललं आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.
आपल्या जिल्ह्यातील 5 आमदार शिंदेंच्या गटात गेले. बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि दुसरीकडे गेलात हे जनता पाहत आहे. राज्यातील जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असं सांगतानाच आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे. हा मतदारसंघ पिंजून काढायचा आहे. महाराष्ट्राला अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्वच हवे, असंही ते म्हणाले.