राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याला मिळाला अदृश्य शक्तींचा 'हात', निवडणूक रंगणार

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला मिळाला अदृश्य शक्तींचा ‘हात’, निवडणूक रंगणार

| Updated on: Jan 18, 2023 | 9:05 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आपल्यामागे एका मोठ्या अदृश्य शक्तींचा 'हात' असल्याचे सांगितले होते. तसाच दावा आता राष्ट्रवादीच्या एका नेत्याने आपल्यामागे अदृश्य शक्तींचा 'हात असल्याचे खबळजनक विधान केलंय.

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM DEVENDRA FADNAVIS ) यांच्या नागपूर ( NAGPUR ) बालेकिल्ल्यात मोठ्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. येथून महाविकास आघाडीचे तीन तर भाजपकडून एक उमेदवार रिंगणात आहेत.

काँग्रेसचे सुधाकर आडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित सदस्य सतीश इटकेलवार हे तिघे निवडणुकीत उतरले आहेत. यातील अपक्ष उमेदवार सतीश इटकेलवार (Satish Itkelwar) यांनी माझ्यामागे अदृश्य शक्तींचा हात आहे, त्यामुळे मीच जिंकून येणार असा दावा केला आहे.

नाशिकप्रमाणे नागपुरच्या निवडणुकीतही अदृश्य शक्ती आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचाही हात माझ्या पाठिशी आहे. देवेंद्र फडणवीस हे देशाचे, महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांची साथ मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे, असं ते म्हणाले आहेत.

Published on: Jan 18, 2023 09:05 AM