कोल्हापुरात मुश्रीफ यांना लोकसभेचं तिकीट? कोणाला शह देण्याची राष्ट्रवादीची तयारी? ठाकरे गटाचं काय?
दरम्यान कोल्हापूरच्या बाबतीत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे बघीतलं जात आहे. तर त्यांना कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात फतरवले जाण्याची शक्यता आहे. याच्याआधी या मतदारसंघाचा विचार केला असता सध्या भाजपमध्ये गेले राज्यसभेचे खासदार धनंजय महाडीक हे राष्ट्रवादीचे आधी खासदार होते.
कोल्हापूर : आता लोकसभा निवडणुकीला एखाद वर्षच शिल्लक आहे. त्यावरून सर्वच राजकीय पक्ष आप आपली राजकीय ताकद आणि उमेदवारांची चाचपणी करत आहे. त्याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जोरदार हालचालींना वेग आला आहे. तर जिल्हानिहाय कोणता चेहरा आपल्याला तारू शकतो या शक्यता पडताळल्या जात आहेत. दरम्यान कोल्हापूरच्या बाबतीत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे बघीतलं जात आहे. तर त्यांना कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात फतरवले जाण्याची शक्यता आहे. याच्याआधी या मतदारसंघाचा विचार केला असता सध्या भाजपमध्ये गेले राज्यसभेचे खासदार धनंजय महाडीक हे राष्ट्रवादीचे आधी खासदार होते. मात्र त्यांनी भाजपशी घरोबा केल्याने त्यांना माजी गृहमंत्री सतेज पाटील यांनी उघड विरोध केला आणि ते पडले. त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाकडून त्यावेळी शिवसेनेतून संजय मंडलीक हे विजयी झाले. तर हातकणंगले मतदार संघात धैर्यशील माने यांनी गड जिंकला. त्यामुळे या दोन्ही जागा शिवसेनाकडे गेल्या. मात्र या दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडी असो किंवा शिवसेना यांच्याकडे तसा तगडा उमेदवार नाही. त्यामुळे जे चेहरे लोकांच्या विश्वासाचे आहेत त्यांना मैदानात उतरविण्याची तयारी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. कोल्हापुरात मुश्रीफ यांना संधी दिल्यास महाडीक यांच्यासह मंडलीक यांना शह देण्याची खेळी राष्ट्रवादीकडून होऊ शकते. तर हातकणंगलेच्या जागेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील आणि कर्णसिंह गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.