भाजपच्या बुद्धीबद्दलच मला शंका आहे, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप!

भाजपच्या बुद्धीबद्दलच मला शंका आहे, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप!

| Updated on: Feb 24, 2022 | 1:10 PM

हा सगळा प्रकार अत्यंत हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी दिली आहे. 29 वर्षानंतर या आरोपांखाली नवाब मलिक यांना अटक होते, यामुळे भाजपच्या बुद्धीबद्दलच मला शंका येतेय

मुंबईः कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना झालेल्या अटकेनंतर आज महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. अंडरवर्ल्डला फंडिंग केल्याचा तसेच तसेच दाऊदशी संबंधित संपत्ती विकत घेण्याचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी दाऊदसंबंधी चौकशीनंतर नवाब मलिक यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली, हा सगळा प्रकार अत्यंत हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी दिली आहे. 29 वर्षानंतर या आरोपांखाली नवाब मलिक यांना अटक होते, यामुळे भाजपच्या बुद्धीबद्दलच मला शंका येतेय, असं वक्तव्य त्यांनी केलं. मुंबईत आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Published on: Feb 24, 2022 01:10 PM