वर्णद्वेष, जातीवाद किती ठासून भरलाय” - जितेंद्र आव्हाड

वर्णद्वेष, जातीवाद किती ठासून भरलाय” – जितेंद्र आव्हाड

| Updated on: Apr 13, 2022 | 12:43 PM

तुमच्या समोर एक मुसलमान बसला होता, त्याला दाढी होती का, तुम्ही मुसलमानांना सर्टिफिकेट देणार का, की हा देशद्रोही आहे, हा नाही, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.

मुंबई : तुमच्या समोर एक मुसलमान बसला होता, त्याला दाढी होती का, तुम्ही मुसलमानांना सर्टिफिकेट देणार का, की हा देशद्रोही आहे, हा नाही, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर जाता, नाकावर जाता, रंगावर जाता, तुमच्यात वर्णद्वेष, जातीवाद किती ठासून भरलाय हे दिसतं. रंग-वर्ण हे कधीही काढू नये. आम्ही जर म्हटलं तुम्ही कसे ढोरपोटे झालाय, तुमचं तोंड कसं सुजलंय, तर तुम्हाला आवडेल का, अशी बोचरी टीकाही आव्हाडांनी केली.

Published on: Apr 13, 2022 12:43 PM