कुठलाही गुन्हा नाही, समंस नाही आणि नोटीस ही नाही; मुश्रीफ यांची टीका

कुठलाही गुन्हा नाही, समंस नाही आणि नोटीस ही नाही; मुश्रीफ यांची टीका

| Updated on: Jan 11, 2023 | 5:26 PM

अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असताना तो ब्रिस्क इंडिया कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आला होता. जी मुश्रीफ यांचे जावाई मतीन मंगोली यांच्या मालकीची आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते, माजी खासदार किरट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर आज त्यांच्या घरासह इतर तीन एक ठिकाणी ईडीने छापे टाकले. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचारा प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. त्यावर आता मुश्रीफ यांनी समोर येत आपली प्रतिक्रिया दिला आहे.

अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असताना तो ब्रिस्क इंडिया कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आला होता. जी मुश्रीफ यांचे जावाई मतीन मंगोली यांच्या मालकीची आहे. याच कारखान्यातील 98 टक्के पैसा हा मनी लाँडरींगच्या माध्यमातून जमवण्यात आल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे.

यानंतर आता मुश्रीफ यांनी आपल्या घरावर मुलच्या घरासह सात ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. मात्र या प्रकरणी मुश्रीफ यांनी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सत्ता आली तरी कारवाई केली जाते, असे म्हणत भाजपवर टीका केली. तसेच ईडीकडून कुठलाही गुन्हा नाही, समंस नाही आणि नोटीस देण्यात आली नाही. थेट छापे टाकण्यात आले. आता सायंकाळी छापेमारी संपल्यावर नवीन काय आहे ते कळेल असंही हसन मुश्रीफ यांनी म्हंटलं आहे.