‘…50 खोके तर लोकांच्या डोक्यात बसलेत’; गुलाबराव पाटील यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी नेत्याची खरमरीत टीका’
ठाकरे गटाकडून शिंदे गटावर पुन्हा गद्दार आणि खोके म्हणत डिवचण्यात आलं होतं. तर यावरून शिंदे गटाकडून पलटवार करताना पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली होती. त्यांनी ठाकरे गटाला बोलायला दोनच मुद्दे आहेत, एक गद्दार आणि दुसरा खोके.
नागपूर : दोनच दिवसांपुर्वी शिवसेनेचा वर्धापन दिन राज्यभरात साजरा झाला. यावेळी ठाकरे गटाकडून आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील वर्धापन दिन घेण्यात आला. मात्र यावेळी ठाकरे गटाकडून शिंदे गटावर पुन्हा गद्दार आणि खोके म्हणत डिवचण्यात आलं होतं. तर यावरून शिंदे गटाकडून पलटवार करताना पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली होती. त्यांनी ठाकरे गटाला बोलायला दोनच मुद्दे आहेत, एक गद्दार आणि दुसरा खोके. आणि जर आम्हाला म्हणा किंवा मला गद्दारी करायचीच असती तर नारायण राणे किंवा राज ठाकरे गेले त्यावेळेसच आम्हाला ऑफर होती. परंतु आम्ही गेलो नाही असं म्हटलं होतं. त्यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. त्यांनी बाकी काहिही असो पण तुम्ही जे केलं त्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात होत असल्याचं म्हटलं आहे. तर कर्नाटकमध्ये 40% कमिशनमुळे सरकार गेलं, तर येथे 50 खोके सगळ्यांच्या मनामनात बसले आहेत. त्यामुळेच गाई, म्हशी, गाढवावरही लोक 50 खोके लिहत आहेत. यावरून तुमच्या विरोधात जनतेच्या मनात किती राग आहे हे लक्षात येत असा टोला लगावला आहे. maharashtra politics