संजय राऊत यांच्या ‘त्या’ मागणीवर राष्ट्रवादीच्या नेत्याची दोनच शब्दात प्रतिक्रिया….
त्यांनी शिंदे यांनी 50 आमदार घेऊन केलेला बंड फसला असता तर शिंदे यांनी आत्महत्या केली असती. त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती असा दावा केला होता. त्यावर ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी बापरे! असं म्हणत खिल्ली उडवली होती.
नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दावा केला होता. त्या दाव्यामुळे राज्यात एकच चर्चा सुरू झाली होती. त्यांनी शिंदे यांनी 50 आमदार घेऊन केलेला बंड फसला असता तर शिंदे यांनी आत्महत्या केली असती. त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती असा दावा केला होता. त्यावर ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी बापरे! असं म्हणत खिल्ली उडवली होती. तर आधी केसरकर यांना पोलीसांनी ताब्यात घ्यायला हवं असे म्हणत टीका केली होती. यावरूनही राजकारण शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. याचमुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी मात्र त्यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळत मला यावर काहीच बोलायचं नाही अशी भूमिका घेतली. तर शिंदे यांच्याबाबतमीत बोलताना, मला सत्ता मिळाली नाही तर मी आत्महत्या करेन हे म्हनेच म्हणजे लोकशाहीचा पराभव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर जनतेच्या समोर जा, जनतेचे मत मिळवा आणि सत्तेवर या असा टोला ही हाणला आहे. maharashtra politics