सवयी आणि नेहमीप्रमाणे नुसती घोषणा करणारे हे सरकार; राष्ट्रवादी नेत्याचा मंत्रीमंडळ विस्तारवरून टीका

सवयी आणि नेहमीप्रमाणे नुसती घोषणा करणारे हे सरकार; राष्ट्रवादी नेत्याचा मंत्रीमंडळ विस्तारवरून टीका

| Updated on: Jun 07, 2023 | 8:56 AM

तर भाजप आणि शिंदे गटातच आता मंत्री पदावरून जुंपल्याने कोणाला मंत्री पद द्यायचं आणि कोणाचं काढून घ्यायचं असा पेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असल्याचं बोललं जात आहे. याचमुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे.

पुणे : रखडलेल्या मंत्री मंडळविस्तारावरून याच्याआधी अनेक वेळा विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे. यावरून टीका ही झालेली आहे. तर भाजप आणि शिंदे गटातच आता मंत्री पदावरून जुंपल्याने कोणाला मंत्री पद द्यायचं आणि कोणाचं काढून घ्यायचं असा पेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असल्याचं बोललं जात आहे. याचमुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे. तसेच टीका करताना या सरकारला सामान्य जनतेशी काहीही घेण देणं नसल्याचं म्हटलं आहे. तर हे मंत्री मंडळविस्ताराचे निर्णय हे आधी महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रात व्हायचे. मात्र आता दिल्ली वाऱ्या कराव्यात लागतात असा टोला लगावला आहे. तर हा मंत्री मंडळ विस्तार रखडल्याने सामान्य लोकांना अडचणी सोसाव्या लागत असल्याचे ते म्हणाले. तर विस्तार जसा अडकला आहे तसे विविध विकास महामंडळेही अडकल्याचं ते म्हणालेत. त्यामुळे नुसत्या घोषणा करणारे हे सरकार असल्याचं ते म्हणालेत.

Published on: Jun 07, 2023 08:33 AM