शिंदेगटाच्या नेत्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; आंदोलनाला आव्हाडांवरील टीकेची झालर

शिंदेगटाच्या नेत्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; आंदोलनाला आव्हाडांवरील टीकेची झालर

| Updated on: Feb 15, 2023 | 12:31 PM

ठाण्यात शिंदे गट विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळतोय. शिंदेगटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पाहा...

ठाणे : ठाण्यात शिंदे गट विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळतोय. शिंदेगटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नरेश मस्के यांच्या टीकेचा राष्ट्रवादीकडून निषेध नोंदवण्यात येतोय. तर अजित पवारांबद्दल जी काही निदर्शन झाली, तो पक्षांतर्गत वाद असून यामध्ये आपण हस्तक्षेप करू नये, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे. सकाळच्या शपथविधीवरून नरेश म्हस्के यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. यानंतर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे ठाण्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

Published on: Feb 15, 2023 12:31 PM