video : ‘सगळं देवदर्शन करुन घ्या, नंतर जनतेचं दर्शन घ्यायचं आहे’- सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार सुनील तटकरे यांनी देखिल शिंदे गटावर अयोध्या दौऱ्यावरून टीका केली आहे. तसेच काय देवदर्शन घ्यायचं असेल ते घ्या. पुन्हा जनतेचं दर्शन घ्यायचं असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना असताना अयोध्या दौरा सतत होत असे. त्यावेळी शिवसेनेतील नेते हे अयोध्येला जात असत. आता शिवसेनेतच दोन गट तयार झाल्याने उद्धव ठाकरे गटाप्रमाणेच शिंदे गट ही अयोध्येला जाण्याच्या तयारीत आहे. त्यावरून आता टीका होताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार सुनील तटकरे यांनी देखिल शिंदे गटावर अयोध्या दौऱ्यावरून टीका केली आहे. तसेच काय देवदर्शन घ्यायचं असेल ते घ्या. पुन्हा जनतेचं दर्शन घ्यायचं आहे. आम्ही तर रोजच जनतेचं दर्शन घेत असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे.
नुकताच काही दिवसांपूर्वी अयोध्या येथील काही महंतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांना अयोध्या येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते स्वीकारले आहे.
Published on: Jan 07, 2023 01:38 PM
Latest Videos