Tv9 Special Report | दीड वर्षानंतर मलिक बाहेर आले; मात्र भाजपच्या गोची होण्याचे कारण काय?
त्यांना सर्वोच्च न्यायालयानं दोन महिन्यांसाठी जामीन दिलाय. मात्र बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा हा प्रश्न नवाब मलिक पुढे आहे. अजित पवारांचा गट की मग शरद पवारांचा गट? तर दोन्हा गटाकडून ते आपल्यालाच पाठिंबा देतील असे बोलले जात आहे.
मुंबई : 16 ऑगस्ट 2023 | मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरूंगात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाला. ते तब्बल दीड वर्षानंतर वैद्यकीय कारणावरून बाहेर आले आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयानं दोन महिन्यांसाठी जामीन दिलाय. मात्र बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा हा प्रश्न नवाब मलिक पुढे आहे. अजित पवारांचा गट की मग शरद पवारांचा गट? तर दोन्हा गटाकडून ते आपल्यालाच पाठिंबा देतील असे बोलले जात आहे. तर मलिकांसाठी अजित पवारांचा गट हा जरा अधिक आशावादी दिसतोय. जर ते त्यांच्या गटात गेले तर मंत्री पदाची लॉट्री देखील लागू शकते. असे असताना मात्र भाजपची आता चांगलीच गोची होण्याची शक्यता दिसत आहे. जर मलिक अजित पवार गटात आलेच तर भाजप कोणती भूमिका घेणार? तर भाजपनंच आरोप केलेला अजून एक नेता सत्तेमध्ये सहभागी होणार का अशा अनेक प्रश्न तयार झाले आहेत. त्यावर हा TV9चा special report