अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावर अजूनही सत्ताधारी आशावादी का? पहा स्पेशल रिपोर्ट
भाजप सोबत जाणार या सर्व चर्चा, तथ्यहीन आणि खोट्या असल्याचे थेट अजित पवार यांनी सांगत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे सांगत या चर्चांचा आणि वावड्यांना पुर्ण विराम दिला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजप सोबत जाणार अशा वावड्या उठल्या होत्या. त्यातच अजित पवार हे एकदा नॉट रिचेबल झाले आणि दोनदा त्यांचे कार्यक्रम रद्द झाले. त्यानंतर ते दिल्लीतही गेले. या सर्व चर्चा, तथ्यहीन आणि खोट्या असल्याचे थेट अजित पवार यांनी सांगत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे सांगत या चर्चांचा आणि वावड्यांना पुर्ण विराम दिला. मात्र हे तर फक्त टिझर होता, पिक्चर बाकीव मेरे दोस्त असेच काहीसे सत्ताधारी म्हणताना दिसत आहेत. याचबाबतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रवक्ते संजय शिरसाट यांनी काय म्हटलय त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
Published on: Apr 20, 2023 07:52 AM
Latest Videos