मी कधी प्रश्न उठवले? ते जाणार नाहीत हेच बोललो; राऊत यांचे अजित पवारांवर स्पष्टीकरण
अजित पवार यांनी आपले मौन सोडले नव्हते. त्यामुळे या चर्चांना अधिकच महत्व आलं होतं. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यावरून जरा जास्तच आक्रमक झाल्याचे दिसत होते. यावरून थेट समोर येत अजित पवार यांनी आपले स्पष्टीकरण दिलं
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार. तर ते सत्तास्थापन करून मुख्यमंत्री होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अजित पवार यांनी आपले मौन सोडले नव्हते. त्यामुळे या चर्चांना अधिकच महत्व आलं होतं. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यावरून जरा जास्तच आक्रमक झाल्याचे दिसत होते. यावरून थेट समोर येत अजित पवार यांनी आपले स्पष्टीकरण दिलं. तसेच आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे सांगत राऊत यांना फटकारलं होतं. त्याला राऊत यांनी प्रत्तुत्तर उत्तर दिलं होतं. त्यावरून त्यांच्यात मतभेद वाढल्याची चर्चा सुरु असतानाच यावरून राऊत यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संदर्भात आजच्या पत्रकार परिषदेत आमच्यात सर्वकाही ठिक आहे. आपण त्यांच्या भूमिकेवर मी कधी प्रश्न उठवले? ते जाणार नाहीत हेच बोललो असे राऊत यांनी अजित पवारांवर स्पष्टीकरण दिलं आहे. तर महाविकास आघाडी मजबूत रहावी म्हणून आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.