मुख्यमंत्रीपदाची वक्तव्य करणं बालिशपणाचं; नाना पटोले यांची राष्ट्रवादीच्या नेत्यावर टीका

मुख्यमंत्रीपदाची वक्तव्य करणं बालिशपणाचं; नाना पटोले यांची राष्ट्रवादीच्या नेत्यावर टीका

| Updated on: Apr 28, 2023 | 8:17 AM

अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्ते म्हणून सर्वांची भावना असल्याचेही ते म्हणाले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टीका केली आहे.

मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लागत आहेत. त्यामुळे अनेक चर्चांना उधान येत आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच काउंटडाऊन सुरू झाल्याचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं आहे. तर अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्ते म्हणून सर्वांची भावना असल्याचेही ते म्हणाले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी खोचक टीका केली आहे. त्यांनी राज्यात आज जी काय परिस्थिती आहे. त्यात शेतकरी तरूण, गरीब महागाई या जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस ही लढत आहे. कोणाची मानसिकता काय कोणाला काय करायचं आहे याबद्दल आम्हाला काय करायचं? कारण निवडणुका नाहीत, प्रक्रिया नाही. मधीच अशापद्धतीने बालिशपणा करण सुरू आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणाला संस्कृतीला शोभणारं नाही असे त्यांनी म्हणत मिटकरी यांना टोला लगावला आहे.

 

Published on: Apr 28, 2023 08:17 AM