Rohit Pawar | फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने तरुणांच्या रोजगाराची संधी हुकली

| Updated on: Sep 13, 2022 | 10:59 PM

वेदांता प्रोजेक्मुटळे दीड लाख लोकांना नोकरी मिळाली असती. तसेच आयएफसी सेंटर या प्रोजेक्टमध्ये देखील दोन लाख तरुणांना नोकरी मिळाली असती, याबाबत देखील विनंती करणार आहे.

मुंबई : महाविकास आघाडी असताना हा प्रोजेक्ट आपल्याकडे यावा यासाठी प्रयत्न केला होता. मात्र या ही सरकारने असा  प्रयत्न केला होता की, आमच्याकडून हा प्रोजेक्ट व्हावा. मात्र असे कळत आहे की, आता तो प्रोजेक्ट गुजरातला गेलेला आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे. मात्र हा प्रोजेक्ट गुजरातला जाऊ नये या संदर्भात देखील मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे. तसेच अजून एक विनंती करणार आहे. आयएफसी सेंटर हा मुंबईचा होता. ते सुद्धा गुजरातला देखील गेलेला आहे, ते देखील परत महाराष्ट्रात आणावे लागेल. कारण वेदांता प्रोजेक्टमुळे दीड लाख लोकांना नोकरी मिळाली असती. तसेच आयएफसी सेंटर या प्रोजेक्टमध्ये देखील दोन लाख तरुणांना नोकरी मिळाली असती, याबाबत देखील विनंती करणार आहे. हे सर्व प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात आलेच पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळात मोठी अडचण येऊ शकते.

Published on: Sep 13, 2022 10:59 PM