Rupali Patil on Kirit Somaiya | प्रताप सरनाईक शिंदे गटात गेल्यानंतर किरीट सोमय्या शांत बसले

| Updated on: Sep 17, 2022 | 10:13 PM

देठाच्या बेंबीपासून ओरडणारे किरीट सोमय्या यांनी आता मौन पकडलं आहे. ते नेहमी ओरडत होते, पण आता  प्रताप सरनाईक शिंदे गटात गेल्यानंतर किरीट सोमय्या शांत बसले आहेत.

पुणे : प्रताप सरनाईक यांच्यावर जो ईडीने गुन्हा दाखल केला होता. कोर्टाने आता क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. यावरुन हे समजत की भाजपमध्ये जे लोक आहेत, त्यांच्यावर त्यांनी कितीही गुन्हे केले, भ्रष्टाचार केला तरी त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही. पण विरोधक आहेत त्यांच्य़ावर कारवाई करणं आणि यंत्रणाचा गैरवापर करणार. ही सरकार म्हणून भाजपची ओळख झाली आहे. देठाच्या बेंबीपासून ओरडणारे किरीट सोमय्या यांनी आता मौन पकडलं आहे. ते नेहमी ओरडत होते, पण आता  प्रताप सरनाईक शिंदे गटात गेल्यानंतर किरीट सोमय्या शांत बसले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी खोटे आरोप केले म्हणून किरीट सोमय्यावर मानहानीचा दावा केला पाहिजे. आणि जे जे भाजपमधील लोक खोटे आरोप करतात गुन्हे दाखल करतात. अशावर सुद्धा खंडणी खोर म्हणुन गुन्हे दाखल करायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे यांनी दिली.

Published on: Sep 17, 2022 10:13 PM