देवेंद्र फडणवीस यांचा तो वादा कोणता? ज्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणाल्या 'क्या हुवा तेरा वादा...

देवेंद्र फडणवीस यांचा तो वादा कोणता? ज्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणाल्या ‘क्या हुवा तेरा वादा…

| Updated on: Sep 05, 2023 | 6:04 PM

ज्या श्री रामचंद्र यांचे नाव घेऊन भाजप राजकारण करते. त्या श्री रामप्रभू यांचे एकही गुण त्यांच्यात नाहीत. प्रभू राम्च्नाद्र यांनी जनतेची काळजी घेतली होती. जनतेवर अत्याचार केला नव्हता, मुह में राम आणि बगल में छुरी असे भाजपचे राजकारण आहे.

जळगाव : 05 सप्टेंबर 2023 | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका घेतली आहे. तो योग्य आहे. मनोज जरांगे पाटील हे खऱ्या अर्थाने वंचित असलेल्या घटकाचे प्रतिनिधित्व करत आहेत. जी सामान्य जनता आहे. मजुरी करत आहेत. त्या समाजाला आरक्षण मिळावे. जे गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळायला हवे. मनोज जरांगे पाटील यांनी आता माघार घेऊ नये. मराठा समाजावर लाठीचार्ज करताना देवेंद्र फडणवीस यांना काही वाटलं नाही. ज्या श्री रामचंद्र यांचे नाव घेऊन भाजप राजकारण करते. त्या श्री रामप्रभू यांचे एकही गुण त्यांच्यात नाहीत. मुह में राम आणि बगल में छुरी असे याचे राजकारण आहे. देवेंद्र फडणवीस यांचा धिक्कार आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी राजीनामा घेतला. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला. मग, देवेंद्र यांची नैतिकता लडाखला गेली होती का? आम्हाला सावरकर यांच्यासारखे माफीवीर नकोत. तर, शिवाजी महाराज यांच्यासारखे स्वाभिमानी राजे हवेत. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण देऊ असे म्हणाले होते. ती कॅबिनेट झालीच नाही का? देवेंद्र फडणवीस ‘क्या हुवा तेरा वादा? वादा पूर्ण करू शकत नसेल तर अलिबाबा चाळीस चोर घेऊन घरी बसा, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या साक्षणा सलगर यांनी केली.

Published on: Sep 05, 2023 06:04 PM