तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटील यांचा दावा
शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या जहरी टीका केली आहे. तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
रायगड : तिकीट वाटप होऊ द्या देशातील चित्र बदलणार आहे. भाजपातून लोक पळतील अशी भविष्यवाणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी काम केली पण कमी केली आहेत. त्यांची एकच बाजू जमेची आहे ती म्हणजे त्यांच्यावर कसला डाग लागलेला नाही. त्यांनी आमच्या संपर्क ठेवला नाही म्हणून मी नाराज होतो असेही आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. शेकापला सोडून अनेक जण गेले, आमदार गेले, खासदार गेले परंतू शेकाप मतदार कमी झालेले नाहीत. जे सोडून गेले त्यांची अवस्था इतकी केविलवाणी आहे की त्यांना तोंड दाखवायला जागा नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. शेकापला सोडून कोणाचेही चांगले झालेले नाही असेही ते म्हणाले.