अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सूरज चव्हाण यांच्या जहरी टीकेनंतर उडाला भडका

| Updated on: May 30, 2024 | 11:27 AM

अजित पवार यांची नार्को टेस्टची मागणी केल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर बोचरी टीका केली आहे. रिचार्जवर चालणारी बाई... असे म्हणत अंजली दमानियांवर टीका केली. रिचार्जवर चालणारी बाई अशी टीका सूरज चव्हाण यांनी केल्यानंतर त्यांचा भडका उडाला.

पुणे अपघातावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केली होती. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर बोचरी टीका केली आहे. रिचार्जवर चालणारी बाई… असे म्हणत अंजली दमानियांवर टीका केली. रिचार्जवर चालणारी बाई अशी टीका सूरज चव्हाण यांनी केल्यानंतर त्यांचा भडका उडाला. ‘अजित पवार आज प्रचंड राग आलाय. तुमच्या पक्षातील सूरज चव्हाण इतक्या खालच्या पातळीचे स्टेटमेंट करतात? शी आज मला त्या सूरज चव्हाणने रिचार्चवर चालणारी बाई म्हटलं.. मला? मी काय आहे आणि किती सिद्धांतावर जगते हे तुमच्यापेक्षा चांगले कुणालाच माहिती नसेल.. ते तुम्ही त्यांना सांगा… मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. मला यावर तुमची ताबडतोब प्रतिक्रिया आणि त्यांच्याकडून लिखित स्वरूपात माफी हवी आहे. ‘, असं अंजली दमानियांनी म्हटले. तर नार्को टेस्टचं आव्हान स्वीकारत अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना सडेतोड उत्तर दिलंय.

Published on: May 30, 2024 11:27 AM
जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? ‘त्या’ कृतीवरून संताप, कुणी केली अटकेची मागणी?
आला रे आला Monsoon केरळात आला, महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनची एन्ट्री