मुख्यमंत्र्यांना वॉर्निंग, 3 मंत्र्यांचे राजीनामे घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी काय?

मुख्यमंत्र्यांना वॉर्निंग, 3 मंत्र्यांचे राजीनामे घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी काय?

| Updated on: Nov 07, 2022 | 4:54 PM

सुप्रिया सुळेंबद्दल अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे.

मुंबईः कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच इशारा दिला आहे. महिलांचा वारंवार अपमान करणाऱ्या ३ मंत्र्यांचा राजीनामा घ्या, नाहीतर तुम्हाला मंत्रालयात बसू देणार नाही, असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला आहे. अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि रविंद्र चव्हाण या तीन मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Published on: Nov 07, 2022 04:54 PM