शरद पवार यांनीच ‘तो’ गौप्यस्फोट केल्याचा राऊत यांचा पुनरुच्चार
तर पवार कुटुंबियांवर दबाव टाकला जात आहे. जर दबावामुळे कुणी पक्षातून बाहेर पडणार असेल, तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. तो पक्षाचा निर्णय नाही. पक्ष म्हणून राष्ट्रवादी कधीच भाजपबरोबर जाणार नाही असे शरद पवार यांनी म्हटलं होतं.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आणि आमदारांकडूनही अशा प्रकारचे दावे करण्यात येत आहेत. तर पवार कुटुंबियांवर दबाव टाकला जात आहे. जर दबावामुळे कुणी पक्षातून बाहेर पडणार असेल, तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. तो पक्षाचा निर्णय नाही. पक्ष म्हणून राष्ट्रवादी कधीच भाजपबरोबर जाणार नाही असे शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतरही अजित पवार यांनी आपली भूमिका मांडलेली नाही. यादरम्यान आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरावर आपण टाम असल्याचे सांगत जे लिहलं ते शरद पवार यांच्या भूमिकेवर. तर राष्ट्रवादी काँग्रेस मविआमधून बाहेर पडणार नाही हे शरद पवारांनीच स्पष्ट केल्याचा पुनरुच्चार संजय राऊतांनी केला