जयंत पाटील यांनी यांनी का म्हटलं शिंदे गटाचं कौतुक करावं वाटतयं? काय आहे प्रकरण?
याचदरम्यान शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल सध्या वारंवार उलटसुलट चर्चांना उधाण येत आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन दबाव निर्माण करु शकतं. त्यातून अजित पवार यांना आपल्यासोबत येण्यास सांगितलं जाऊ शकतं अशी चर्चा राज्यात रंगली आहे. याचदरम्यान शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे. त्यांनी आपल्याला शिंदे गटाचं कौतुक वाटतं असल्याचं म्हटलं आहे. तर जो शिंदे गट, त्यातील विजय शिवतारे, गुलाबराव पाटील यांनी, अजित पवार आणि राष्ट्रवादीला लाखोली वाहिली होती. ज्यांनी मुळ पक्ष सोडला ते अजित दादांच्या येण्याची वाट बघतायत किंवा येण्याच्या बद्दल अशी वक्तव्य करतायत. त्यांनी त्यांची आधीचे वक्तव्य आठवली तर त्यातला अर्थ कळेल असा घणाघात केला आहे.