Maharashtra political crisis : अजित पवार यांच्या बंडावर अमोल मिटकरी म्हणतात. ‘दादा म्हणजेच पक्ष…, आमचा पक्ष फुटलेला नाही’
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपली बाजू मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला दावा ठोकला आहे. यावरूनच राष्ट्रवादी पक्ष फूटल्याचे बोलले जात आहे. याचमुद्द्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी आमचा पक्ष फुटला नाही असे स्पष्ट केलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपली बाजू मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला दावा ठोकला आहे. यावरूनच राष्ट्रवादी पक्ष फूटल्याचे बोलले जात आहे. याचमुद्द्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी आमचा पक्ष फुटला नाही असे स्पष्ट केलं आहे. तर राष्ट्रवादीतील सर्व आमदार हे अजित पवार यांच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी, शरद पवार आम्हाला वंदनीय आहेत, मी गुरु पोर्णिमानिम्मित अजित पवार यांना भेटायला आलो होतो. तर शरद पवार आमच्यासाठी भीष्मपितामह असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी पक्ष म्हणजे अजित पवार आणि पक्ष म्हणजेच शरद पवार असे असल्याचं देखील ते म्हणालेत.
Published on: Jul 03, 2023 02:09 PM
Latest Videos