Mehboob Shaikh : तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; माझ्यावेळी 1760 होते.. ; मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्यावर खोचक टीका
Mehboob Shaikh On Chitra Wagh : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका करत माझ्यावर टीका करताना चित्रा वाघ यांनी 1760 पायाला बांधून फिरत असल्याचा आकडा सांगितला होता, असं म्हंटलं आहे.
काही व्यक्ती अशा आहेत, की त्यांनी तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते. माझ्यावर टीका करताना चित्रा वाघ यांनी 1760 आकडा सांगितला होता, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी म्हंटलं आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काल विधिमंडळ अधिवेशनात बोलताना दिशा सालियान मुद्द्यावरून टीका करताना परब यांना मी तुमच्या सारखे 56 पायाला बांधून फिरते, असं म्हंटलं होतं. त्यांच्या या विधानावरून आता जोरदार टीका होत आहे. यावर नेते मेहबूब शेख यांनी देखील बोचरी टीका केली आहे. तसंच कंबरेखालची भाषा चांगल्या घरातील महिला बोलू शकते का? असा प्रश्न देखील शेख यांनी उपस्थित केला आहे. कुठेही गेलं की तोंडातून घाणच बाहेर पडणार असं काही लोकांचं असतं. लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायकोचं तेच आहे. आपल्याला काहीतरी भंपकपणा करायचा आहे. त्यासाठीच आपल्याला भाजपने आमदारकी दिलेली आहे. अशाने सभागृहाचं पावित्र्य राहणार नाही, असंही मेहबूब शेख यांनी म्हंटलं आहे.

येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
