VIDEO | ड्रेसकोडवरून राजकाण्यांची उडी; राष्ट्रवादी नेता म्हणाला, ''जे नियम भक्तांसाठी तेच पूजाऱ्यांसाठीही''

VIDEO | ड्रेसकोडवरून राजकाण्यांची उडी; राष्ट्रवादी नेता म्हणाला, ”जे नियम भक्तांसाठी तेच पूजाऱ्यांसाठीही”

| Updated on: May 28, 2023 | 7:08 AM

आता राज्यातील सगळ्याच मंदिरात ड्रेसकोड लागू होण्याची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून निर्णय घेण्यात येणार आहे. याची माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली होती.

कराड : सध्या राज्यातील अनेक मंदिरात ड्रेसकोडवरून नियम लागू केले जात आहे. यावरून राजकारण तापताना दिसत आहे. याचमुद्द्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी तुळजाभवानी मंदिर प्रशासनाला सुनावले होतं. त्यानंतर आता राज्यातील सगळ्याच मंदिरात ड्रेसकोड लागू होण्याची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून निर्णय घेण्यात येणार आहे. याची माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली होती. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मागणी करताना जसा भक्तांना नियम आहेत तसेच पूजाऱ्यांही ते असावेत असे म्हटलं आहे. तर तोकडी कपडे घालून येणं हा नियम भक्तांसाठी आहे की पुजारांसाठी हे सुद्धा एकदा स्पष्ट करावं असेही त्यांनी म्हटलं आहे. तर पूजाऱ्यांही ड्रेस कोड हवा पूजाऱ्यांनीही मंदिरात उघडे राहता कामा नये असेही त्यांनी मागणी केली आहे.

Published on: May 28, 2023 07:08 AM