पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर राष्ट्रवादी आमदार यांचा गंभार आरोप; म्हणाला, ”टक्केवारी गोळा”
बीड जिल्ह्यात पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी टक्केवारी दिल्याशिवाय एकही काम त्यांनी दिलं नाही, असा खळबळजनक आरोप सावे यांच्यावर केला आहे.
बीड : विकास कामं आणि टक्केवारी यावरून राज्यातील अनेक भागात अनेक कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांबाबत दावे आणि गंक्षीर आरोप केल्याचे अनेक दाखले आहेत. मात्र एका आमदारानं पालकमंत्र्यांवर असे गंभार आपोर याच्याआधी केलेले नव्हते. पण आता बीड जिल्ह्यात पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी टक्केवारी दिल्याशिवाय एकही काम त्यांनी दिलं नाही, असा खळबळजनक आरोप सावे यांच्यावर केला आहे. ज्यामुळे सध्या जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तर याची जिल्ह्यात जोरदार चर्चा आजवर सुरू आहे. तसेच अतुल सावे हे एजंट नेमून विकासकामाच्या नावाखाली टक्केवारी गोळा करत आहेत. त्यांनी जिल्ह्यातून कामांसाठी 10 टक्क्यांनी वसुली केली आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी 10 टक्के देऊन कामे आणली असाही दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकीय तापमान आता गरम झाले असून यावर पालकमंत्री सावे काय स्पष्टीकरण देतात हे पहावं लागणार आहे.