Ambadas Danve | जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा अंबादास दानवे यांच्याकडून विरोध

Ambadas Danve | जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा अंबादास दानवे यांच्याकडून विरोध

| Updated on: Jan 03, 2023 | 2:41 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या त्या वादग्रस्त विधानाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच औरंगजेब हा क्रूरच होता आणि हिंदू द्वेष्टा होता असेही म्हटलं आहे

राज्यात अजित पवार यांच्या विधानामुळे प्रचंड गदारोळ सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त विधान केले. त्यानंतर आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसविरोदात आणि नेत्यांविरोधात आंदोलने केली जात आहेत. टीका ही होत आहे.

त्यातच आता मविआ मधील मित्र पक्षाने देखिल आव्हाड यांच्या वक्तव्याला विरोध केल्याने मविआमध्येच मतभेद असल्याचेच बोललं जात आहे.

आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर आणि हिंदू द्वेष्टा नव्हताच असे म्हंटलं होतं. त्याच विधानावर ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोध दर्शविला आहे.

तसेच औरंगजेब हा क्रूरच होता आणि हिंदू द्वेष्टा होता. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार वेगळेच आहेत असे दानवे यांनी स्पष्ट केले आहे.

Published on: Jan 03, 2023 02:41 PM