ईडी, सीबीआय बीजेपी ने जन्म घातलेले विषय नाहीत : नितेश राणे
ईडी, सीबीआय, आयकर विभाग या संस्था काय भाजपच्या सरकारच्या काळात जन्माला आलेल्या आहेत का? यूपीएच्या सरकारच्या काळापासून या सगळ्या संस्था आहेत. यूपीएच्या काळामध्ये दखिल बाजपच्या असंख्य नेत्यांवर असे छापे पडले आहेत
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. मागच्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जाणीव पुर्वक केली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. यावर विचारले असता भाजप नेते आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया दिली. ईडी, सीबीआय, आयकर विभाग या संस्था काय भाजपच्या सरकारच्या काळात जन्माला आलेल्या आहेत का? यूपीएच्या सरकारच्या काळापासून या सगळ्या संस्था आहेत. यूपीएच्या काळामध्ये दखिल बाजपच्या असंख्य नेत्यांवर असे छापे पडले आहेत. राजकारण करण्याची गरज नाही. मुश्रीफ यांची फक्त चौकशी सुरू आहे. त्यांना अटक झाली आहे का? कुठेतरी आर्थिक गैरव्यवहार सापडल्याशिवाय ईडी कोणावरही रेड मारत नाही. मुश्रीफांकडे कुठलातरी आर्थिक गैरव्यवहार सापडला असेल म्हणून ही चौकशी सुरू असेल.