संजय राऊत हे विद्वान, तरिही त्यांना काही गोष्टी माहित नसावं? : संजय शिरसाट
कारवाईला फेस करणे हे आपलं काम असतं हे त्या संजय राऊत सारख्या बिनडोक माणसाला कळत नाही. आता संजय राऊतांची लाज वाटायला लागली आहे
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. मागच्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी शिवसेना आणि भाजपला टार्गेट करत टीका केली होती. त्यावर शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत ईडीची कारवाई काही एका दिवसातली नसते? अनेक दिवसांपासून त्याचा तपास केला जातो हे संजय राऊत सारख्या विद्वानाला माहित नसावं? तर हसन मुश्रीफ हे काही धुतलेल्या तांदळा सारखे आहेत का? जर दोशी नसाल तर निश्चित सुटाल. कारवाईला फेस करणे हे आपलं काम असतं हे त्या संजय राऊत सारख्या बिनडोक माणसाला कळत नाही. आता संजय राऊतांची लाज वाटायला लागली आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. ते सर्व पक्षाचे प्रवक्ते झाले आहेत.
Published on: Mar 11, 2023 04:12 PM
Latest Videos