‘त्या’ अधिकाऱ्याला प्रचंड माज, ८ तासात ऑडीओ क्लिप बाहेर काढल्या : आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांनी आज आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. महेश आहेर या अधिकाऱ्याला प्रचंड माज आहे असं म्हटलं आहे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपविण्यासाठी सुपारी दिल्याचे संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर ही ऑडिओ क्लिप ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त महेश आहेर यांची असल्याचे समोर आले होते. तर तिहार जेलमधील गँगस्टर बाबाजी ऊर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शार्पशूटरला सुपारी दिल्याचे संभाषण यात होते. यावर जितेंद्र आव्हाड यांनी आज आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. महेश आहेर या अधिकाऱ्याला प्रचंड माज आहे. याच्यासंदर्भातील आम्ही ८ तासात ऑडीओ क्लिप बाहेर काढल्याचे देखिल आव्हाड म्हणाले. तसेच याबाबत अजून अनेक बाबी उघड होतील. त्याने माझ्या मुलीला धमकी दिली. याबाबत मी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. मात्र अजूनही त्या अधिकाऱ्यावर कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही, असेही आव्हाड म्हणाले.
Published on: Mar 15, 2023 12:39 PM
Latest Videos