ते स्वतः ला विचारवंत समजतात!; आव्हाडांना शिवसेना नेत्याने डिवचले

ते स्वतः ला विचारवंत समजतात!; आव्हाडांना शिवसेना नेत्याने डिवचले

| Updated on: Mar 31, 2023 | 9:04 AM

आव्हाड हे स्वतः दूनिये पेक्षा वेगळा आहे, मी सुशिक्षित आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न ते ट्विट आणि मीडियाच्या मुलाखतीद्वारे करत असतात असा टोला म्हस्के यांनी लगावला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिन्नर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर सडकून टीका केली होती. त्यावर आता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे. यावेळी म्हस्के यांनी, जितेंद्र आव्हाड म्हणजे सगळीकडे चेष्टेचा विषय झाला आहे. ते स्वतः ला विचारवंत समजतात. स्वतः दूनिये पेक्षा वेगळा आहे, मी सुशिक्षित आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न ते ट्विट आणि मीडियाच्या मुलाखतीद्वारे करत असतात असा टोला लगावला आहे. तर आपलं मोठे पण दाखवण्यासाठी आव्हाड हे फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचांचे असल्याचे सांगतात. मात्र ते या समाजसुधारक नेत्यांचा वापर स्वतः ची इमेज वाढविण्याकरिता करतात अशीही टीका त्यांनी केली आहे.

Published on: Mar 31, 2023 09:04 AM