Makarand Patil | राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मतदारसंघातील कामासाठी भेट
Makarand Patil | पश्चिम महाराष्ट्रातील आमदार मकरंद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. विकास कामांबाबत ही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.
Makarand Patil | पश्चिम महाराष्ट्रातील आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. विकास कामांबाबत ही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत नेत्यांच्या भेटीवरुन उलटसूलट चर्चा रंगत होत्या. मात्र मतदारसंघातील अनेक विकास कामांचा गाडा पुढे हालत नसल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीच्या (Nationalist Party) ताब्यात सगळा कारभार गेल्याचा आरोप करत शिवसेनेच्या आमदारांना निधीसाठी लटकत रहावे लागते. ताटकाळत रहावे लागते, असा आरोप केला होता. त्यातूनच राज्यात सत्तांतराचे नाट्य घडले. यामध्ये सर्वाधिक फटका अर्थात शिवसेनेला बसला. शिवसेनेला मोठे भगदाड पडले. शिवसेनेचे बंडखोर आमदारांच्या मदतीने भाजप सत्तेत आली. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार शिंदे यांच्याकडे निधीसाठी येत आहेत. त्यांच्या मतदारसंघात विकास कामे त्वरीत व्हावीत यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. त्यामुळे आता भाकरी फिरवल्या गेल्याची चर्चा रंगली आहे.