रामदास आठवले यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा रोहित पवार यांच्याकडून समाचार
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीला आपल्याकडे या अशी ऑफर दिली. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यावरून भाजपवर निशाना साधला आहे. तसेच राहुल गांधी असो की, महाराष्ट्रातील भाजपविरोधी नेते असतील यांच्या विरोधात भाजप दबाव तंत्राचा वापर करत आहे. भाजप अंहकाराने वागत आहे. त्यामुळे 2029 ची गरज नसून 2024 मध्येच देशात सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास त्यांनी दाखवला आहे. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलेल्या ऑफरवरून त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आठवले साहेब हे मोठे नेते आहेत. पण राष्ट्रवादीने त्यांच्याकडे यावं असं विधान करणं हे हास्यास्पद आहे. पण या विधानाकडे न बघता कृतीमुळे भाजप आणि मित्र पक्ष हे शिंदे गटाचे जे काही खासदार आहेत त्या ठिकाणी क्लेम येत्या काळामध्ये करतील हे पाहायला मिळेल असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Published on: Mar 27, 2023 09:33 AM
Latest Videos