हे सरकार फक्त कागदावरच काम करत, तसं बजेट नसावं : रोहित पवार
बजेटमध्ये सरकारचं मुंबईवर फोकस जास्त राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मुंबईवर फोकस करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. पण मुंबईबरोबर महाराष्ट्रावर सुद्धा फोकस करण्याची जरुरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं.
मुंबई : यावेळीचं अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. त्यावर अख्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी रोहित पवार यांनी शिवसेना भाजप सरकारला टोला लगावत राज्य सरकारचं हे बजेट फक्त कागदावर नसावा अशी अपेक्षा व्यक्त करत हे सरकार आर्थिक शिस्त पाळात नाही अशी टीका केली. या बजेटमध्ये सरकारचं मुंबईवर फोकस जास्त राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मुंबईवर फोकस करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. पण मुंबईबरोबर महाराष्ट्रावर सुद्धा फोकस करण्याची जरुरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर हे पहिल्यांदाच फडणवीस हे मोठं बजेट मांडत आहेत. फक्त हे सरकार 18 तास काम काम करत. जे फक्त कागदावरच दिसतं. तसे हे बजेट फक्त कागदावर ते सामान्य लोकांना सेवा देण्यासाठी असावं अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली