छत्रपती संभाजीनगरमधील राड्यामागे कोणता राजकीय हेतू का? रोहित पवार यांचा सवाल उपस्थित

छत्रपती संभाजीनगरमधील राड्यामागे कोणता राजकीय हेतू का? रोहित पवार यांचा सवाल उपस्थित

| Updated on: Mar 30, 2023 | 1:55 PM

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. काही लोक मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत, असं रोहित पवार म्हणाले आहेत. पाहा व्हीडिओ...

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल जो राड्याचा प्रकार घडला त्यामागे राजकीय हेतू काही आहे का? हे पाहावं लागेल, असं रोहित पवार म्हणाले आहेत. युवा वर्गाला सांगेन एकमेकांचा मान ठेऊन सण साजरे करावेत. ठराविक लोक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. काही वाद राजकीय दृष्टीकोनातून निर्माण केला जात आह. हा वाद झाल्याशिवाय काही लोक सत्तेत येऊ शकत नाहीत. लोकांनी विचार केला पाहिजे. अशा गोष्टींना बळी पडता कामा नये, असं रोहित पवार म्हणालेत.

Published on: Mar 30, 2023 01:53 PM