धक्कादायक! रोहित पवार यांच्या पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

धक्कादायक! रोहित पवार यांच्या पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

| Updated on: Jul 17, 2023 | 9:32 AM

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असणाऱ्या कलहामुळे शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही वेगळे झाले आहेत. राजकिय गट तयार झाले आहेत.

पुणे, 17 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार जनसंपर्क कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या प्रकरणी दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आमदार रोहित पवार यांचे हडपसर भागात जनसंपर्क कार्यालय आहे. या जनसंपर्क कार्यालयाला अज्ञात व्यक्तीने आग लावण्याचा प्रयत्न केला. ज्यात कार्यालयाजवळील सायकल आगीत जळाली. तर त्यांच्या कार्यालयाला काळे फासण्याचाही प्रयत्नही करण्यात आला. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असणाऱ्या कलहामुळे शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही वेगळे झाले आहेत. राजकिय गट तयार झाले आहेत. तर रोहित पवार हे शरद पवार यांच्याबरोबर असून त्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांची बाजू लावून धरली आहे.

Published on: Jul 17, 2023 09:32 AM