अमोल कोल्हेंच्या 'त्या' पोस्टने सर्वांनाच टाकले बुचकळ्यात, आता स्पष्टीकरण देत म्हणाले, मला...

अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ पोस्टने सर्वांनाच टाकले बुचकळ्यात, आता स्पष्टीकरण देत म्हणाले, मला…

| Updated on: Apr 24, 2023 | 10:20 AM

तर फोटोमध्ये त्यांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाषण संग्रहाचे पुस्तक ‘नेमकची बोलणे’ हे आहे. तर दुसऱ्या फोटोत ‘द न्यू बीजेपी’ नावाचे पुस्तक दिसत आहे. त्यामुळे त्यांना नेमकं कोणाच्या विचारधारेवर बोलायचं आहे हा प्रश्न पडला आहे.

मुंबई : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यादरम्यान त्यांनी केलेल्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त एका ट्वीटमुळे पुन्हा खळबळ उडालेली आहे. या ट्वीटमध्ये विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरू कोण? असे म्हटलं आहे. तर फोटोमध्ये त्यांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाषण संग्रहाचे पुस्तक ‘नेमकची बोलणे’ हे आहे. तर दुसऱ्या फोटोत ‘द न्यू बीजेपी’ नावाचे पुस्तक दिसत आहे. त्यामुळे त्यांना नेमकं कोणाच्या विचारधारेवर बोलायचं आहे हा प्रश्न पडला आहे. तर पुन्हा एकदा भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावरून आता कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिल आहे. ज्यात त्यांनी, अमोल कोल्हेंना फक्त इतकच सुचवायचं आहे की, विचारधारा कोणतीही असो, तिचा विरोध करायाचा असेल तर आधी तिचा अभ्यास करावा लागतो. बाकी काही नाही म्हणत इतर चर्चांनी त्यांनी फेटाळून लावलं आहे.

Published on: Apr 24, 2023 10:20 AM