राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात? सुनील तटकरे यांचा नेमका दावा काय?
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे अजितदादा यांच्या शपथविधीला राजभवन येते उपस्थित होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांनी शरद पवार यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तर, शरद पवार यांच्यासोबत त्यांनी अनेक सभांना उपस्थिती लावली होती.
मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आम्ही येत्या १५ डिसेबरपर्यंत आम्ही सर्व राज्याचा दौरा करणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादीचे (अजीतदादा गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका हीच आहे की नेमका खर पक्ष कोणता? यासाठी आम्ही देखील याचिका दाखल केली आहे. मोहमद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्यासंदर्भात आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे याचिका केली आहे. त्याचाही ही निर्णय व्हावा. संसदरत्न नेहमी अदृश्य शक्तीचा उल्लेख करतात. पण, आम्ही जो निर्णय घेतला तो अजित दादांच्या नेतृत्वात घेतला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून हा निर्णय घेतला असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला. खासदार अमोल कोल्हे यांनी आम्हाला पहिल्याच दिवशी समर्थन दिले आहे. अजितदादा यांच्या शपथ विधीसाठी ते राजभवनावर हजर होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात याचिका केली नाही आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.