सावरकरांच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेवरून फडणवीस यांचे पवारांना प्रत्युत्तर
शरद पवार यांनी, वीर सावरकर वादावरही आपले मत मांडले. यावेळी त्यांनी सावरकर यांनी प्रबोधनात्मक ज्या गोष्टी सांगितल्या त्याला आपला विरोध नाही. पण त्यांची हिंदू राष्ट्र ही भूमिका आपल्याला मान्य नाही असे ते म्हणाले होते
नाशिक : येथील देवरगावमध्ये आदिवासी आश्रम शाळा आणि महिला वसतीगृहाचा भूमिपूजन सोहळ्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्यातील विविध घडामोडीवर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अयोध्याच्या दौऱ्यावर टीका केली. तर राज्यात सुरू असलेल्या वीर सावरकर वादावरही आपले मत मांडले. यावेळी त्यांनी सावरकर यांनी प्रबोधनात्मक ज्या गोष्टी सांगितल्या त्याला आपला विरोध नाही. पण त्यांची हिंदू राष्ट्र ही भूमिका आपल्याला मान्य नाही असे ते म्हणाले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. तसेच ते काय म्हणतात? त्यांना काय वाटतं यााच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही. त्यांना मान्य नाही. पण आम्हाला सावरकर यांची हिंदू राष्ट्र ही भूमिका मान्य आहे. भारतामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात. त्यामुळे तुम्ही याला हिंदू राष्ट्र म्हणा की म्हणू नका. पण भारत हा हिंदू राष्ट्र आहेच.