‘एवढा अपमान? मी याबाबत त्यांच्यासोबत’; सुप्रिया सुळे यांचा फडणवीस यांना पाठिंबा
शिंदे गटाकडून सुधारित जाहिरात देण्यात आली आहे. त्यावरूनही आता ठाकरे गटासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. याचमुद्द्यावरू राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आधी टीका केली आहे.
मुंबई : राज्यात शिंदे गटाकडून काल देण्यात आलेल्या जाहिरातीवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ती जाहिरात शिंदे यांच्या कोणीतरी हितचिंतकाणं दिल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं. तर आज शिंदे गटाकडून सुधारित जाहिरात देण्यात आली आहे. त्यावरूनही आता ठाकरे गटासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. याचमुद्द्यावरू राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आधी टीका केली आहे. त्यांनी, दिल्लीतील अदृश्य हातांमुळे 24 तासात जाहिरात बदलावी लागली असा टोला शिंदे गटासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
त्यानंतर आता पुन्हा एकदा याच जाहिरातीच्या प्रकरणावरून सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतली आहे. तसेत फडणवीस यांचा अपमान शिंदे गटाकडून झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर फडणवीस हे आमचे विरोधक असले तरी शिंदे गटाने त्यांचा अपमान केला. त्यामुळे मी याबाबत फडणवीस यांच्यासोबत आहे. एवढा अपमान झाल्यानंतर का जावं कार्यक्रमाला? असही त्यांनी म्हटलं आहे. तर वारकरी लाठीचार्जची सविस्तर चौकशी व्हावी याची मागणी आपण फडणवीस यांच्याकडं करणार असल्याचं त्या म्हणाल्या. तर गृहखात काय करतंय असा प्रश्न उपस्थितीत राहतोय, असेही सुळे म्हणाल्या.