लव्ह जिहादमधून होणाऱ्या अन्यायावरही कधीतरी तळमळीने बोला’; भाजप नेत्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याला सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुस्लिम समाजातील महिलांबरोबरचा एक व्हीडिओ व्हायरल होतं आहे. तर माजी मंत्री नवाब मलिक आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबतीतही त्या काहीना काही बोलत आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुस्लिम समाजातील महिलांबरोबरचा एक व्हीडिओ व्हायरल होतं आहे. तर माजी मंत्री नवाब मलिक आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबतीतही त्या काहीना काही बोलत आहेत. त्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच एका विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी जे राजकारण सुरू आहे. त्यावर आपला विरोध) असल्याचे ते म्हणाले. तसेच ज्याप्रकारे त्यांनी सुप्रिया सुळे या विरोध करत आहेत. त्यावर हेच लक्षात येतं की त्यांना हिंदू मतांची आणि हिंदूंची गरजच नाही. हिंदू आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतच नाहीत. तर ज्याप्रमाणे पठाण चित्रपटाच्या वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोललं गेलं. त्याचप्रकारे केरला स्टोरीच्या निमित्ताने हिंदू तरुणींवर लव्ह जिहादमधून होणाऱ्या अन्यायावरही कधीतरी तळमळीने बोला असा टोला लगावला आहे.