खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, माझ्याकडे वाईट नजरेने बघणारा तो पुरुष…
मी काय खाते, काय पिते याच्यावर कुणी तरी लक्ष ठेवत आहे. एका महिलेवर अनेक पुरुष इंदापूर आणि पुरंदरमध्ये लक्ष ठेवतात की मी काय खाते आणि काय पिते. यामुळे माझ्या सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई : मी काय खाते, काय पिते याच्यावर कुणी तरी लक्ष ठेवत आहे. एका महिलेवर अनेक पुरुष इंदापूर आणि पुरंदरमध्ये लक्ष ठेवतात की मी काय खाते आणि काय पिते. यामुळे माझ्या सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मी एक महिला आहे. महिलांनो तुम्ही काय खाताय याकडे पुरुषांनी लक्ष ठेवले तर तुम्हाला चालेल का? माझ्यावर अन्याय आहे. मी एक महिला आहे आणि माझ्यावर जर पुरुष वाईट नजरेने बघणार असतील तर मी अमित शहा यांच्याकडे न्याय मागणार आहे. या देशामध्ये सगळे कायदे महिलांच्या बाजूने आहेत आणि पुरुष जर वाईट नजरेने काय खाते आणि काय पिते यावर लक्ष ठेवणार असतील तर मला सिक्युरिटी दिली पाहिजे. जे पुरुष वाईट नजरेने माझ्या खाण्यापिण्याकडे बघतात त्यांना अटक झाली पाहिजे. तसेच, मला सिक्युरिटी वाढविण्यात यावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.