वारकऱ्यांवर लाठीचार्जवर सुप्रिया सुळे संतापल्या, सरकार निशाना साधत म्हणाल्या, ‘विठूभक्तावर दबाव’
लाठीचार्ज घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला असून यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राजकीय नेत्यांनी सरकारवर टीका केली.
पुणे : आळंदी येथून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानावेळी मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद झाला. तेव्हा तेथे पोलीसांनी बळाचा वापर करत वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला असून यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राजकीय नेत्यांनी सरकारवर टीका केली. त्यानंतर याघटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी आधी ट्विट करत सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुळे यांनी टीका केली. त्यावेळी त्यांनी, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकारने याची चौकशी केली पाहिजे. या घटनेचा मी निषेध करते. ऑलिंपिक विजेते असतील किंवा माऊली विठूभक्त यांच्याविरुद्ध केंद्र व राज्य सरकार पोलिसाचा ताकतीचा गैरवापर करत आहे. शांततेच्या मार्गाने माऊली माऊली करत आपण सर्वजण पंढरीला जात असतो. अशा लोकांना पोलिसांनी जी वागणूक दिली ती दुर्दैवी असल्याचं सुळे यांनी म्हटलंय.