अन् चंद्रकांत पाटलांनी चक्क अजित पवारांची चौकशी केली? काय आहे कारण?

अन् चंद्रकांत पाटलांनी चक्क अजित पवारांची चौकशी केली? काय आहे कारण?

| Updated on: Apr 26, 2023 | 3:57 PM

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील कालवा समितीची बैठक पार पडत आहे. पुण्यात पाणीकपात होणार का? हे या बैठकीत ठरणार आहे. पुणे येथील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीच्या या बैठकीला अजित पवार रहाणार होते.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांपासून मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्यापर्यंत आणि सासूरवाडीपासून ते मुंबईसह नागपुरमध्ये भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लागण्यापर्यंत त्यांची चर्चा होत आहे. त्यातच आता भाजपनेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची थेट चौकशी केल्याने पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील कालवा समितीची बैठक पार पडत आहे. पुण्यात पाणीकपात होणार का? हे या बैठकीत ठरणार आहे. पुणे येथील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीच्या या बैठकीला अजित पवार रहाणार होते. त्याच्याआधी चंद्रकांत पाटील यांनी गाडीतून उतरताच कार्यकर्त्यांना अजित दादा आले आहेत का? की आज देखील गायब झाले? असा खोचक सवाल केला. या प्रश्नामुळे कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्यात चर्चांना सुरुवात झाली.

Published on: Apr 26, 2023 03:00 PM