आम्ही पब्लिक फिगर असल्यामुळे, पण बदनामी किती करायची? नॉट रिचेबलवरून अजित पवार संपातले
अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करताना, अशा बातम्या दाखवताना, छापताना एखाद्याची बदनामी होणार नाही हे पहा अशी विनंती केली आहे. त्याचबरोबर आपल्याला पित्ताचा त्रास झाल्याने आपण कार्यक्रम रद्द केल्याचे ते म्हणाले
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील आपले दोन दिवसांच्या दौऱ्यावा ब्रेक लावला होता. अचानक सगळे कार्यक्रम रद्द केल्याने नक्की काय झालं असा प्रश्न सगळ्यांना पडला आणि त्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल होते. यावरून अनेक प्रसार माध्यमांनी बातम्या चालवल्या. त्यावरून अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करताना, अशा बातम्या दाखवताना, छापताना एखाद्याची बदनामी होणार नाही हे पहा अशी विनंती केली आहे. त्याचबरोबर आपल्याला पित्ताचा त्रास झाल्याने आपण कार्यक्रम रद्द केल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर आम्ही आम्ही पब्लिक फिगर असल्यामुळे तुम्हाला बातम्या करण्याचा अधिकार आहे. पण अशा प्रकारच्या बातम्या देताना शेवटी आम्ही माणूस आहोत हे ही बघा असे म्हणालेत. एखाद्याची बदनामी करायची म्हणजे किती बदनामी करायची असाही सवाल त्यांनी केला आहे.